अध्याक्षर "क " पासून म्हणी


मराठी म्हणी

कोल्हा काकडीला राजी - लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
गाढवाला गुळाची चव काय - अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
घोडामैदानजवळ असणे - परीक्षा लवकरच होणे
डोंगर पोखरून उंदीर कढणे - जास्त श्रम करून कमी फायदा होणे

अर्थासह मराठी म्हणी


1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

अध्याक्षर " ढ " पासून म्हणी

  ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो.

    ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.

    ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी.

    ढुंगणाचं काढून डोक्याला बांधणे.

अध्याक्षर " उ" पासून म्हणी


उंट पाण्यात बुडालाय नि शेळी म्हणतीय मी ये‌ऊ काय?
उंच वाढला एरंड तरी हो‌ईना इक्षुदंड.

उंटावरचा शहाणा.

उंदराला मांजराची साक्ष.

उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.