समास

समास (Samas)

या पृष्ठावर माहिती भरणे चालू आहे . 


: शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात.व तयार होणार्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात, या शब्दांची फोड करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात.  ( सम + अस = एकत्र होणे )
समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात.

1)अव्ययी भाव समास (प्रथम पद प्रधान )
2)तत्पुरुष समास:

अ )विभक्ती तत्पुरुष
आ )अलुक तत्पुरुष
इ)उपपद तत्पुरुष
ई)नत्र तत्पुरुष
उ )कर्म धारय
ऊ )द्विगु
ए )मध्यम पदलोपी

3)द्वंद्व समास:

अ)इतरेतर द्वंद्व
आ)वैकल्पिक द्वंद्व
 इ)संहार द्वंद्व

4)बहुर्वीही समास:

अ)विभक्ती बहुर्वीही:

1)समानाधिकरण बहुर्वीही
2)व्याधीकरण बहुर्वीही:

आ)नत्र बहुर्वीही
इ)सहबहुर्वीही
ई)प्रादिबहुर्वीही

1)अव्ययीभाव समास  (प्रथम पद प्रधान):
या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून, ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषना सारखा केला जातो तेव्हा तो अव्यायी भाव समास होतो. हे शब्द स्थळ/काळ/रीतिवाचक  असतात.
अ)    आ, यथा, प्रती, हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात.



क्र.
सामासिक शब्द
विग्रह
1
आजन्म
जन्मापासून (कालवाचक)
2
आमरण
मरेपर्यंत  (कालवाचक )
3
यथाक्रम
क्रमाप्रमाणे (रीतिवाचक
4
प्रतिक्षण
प्रत्यक  क्षणाला  (कालवाचक)
5
यथान्याय
न्यायाप्रमाणे  (रीतिवाचक )


आ)    बे, दर, बेला, गैर, हर, बर, बिन यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत.

  
        


1
दरसाल
प्रत्येक  वर्षी  (कालवाचक)
2
हररोज
प्रत्येक   दिवशी (कालवाचक)
3
बिनधास्त
धास्तीशिवाय  (रिती वाचक)
4
बेशक
शंका न घेता/शंकेशिवाय (रीतिवाचक)
5
बेलाशक
शंका न घेता/शंकेशिवाय  (रीतिवाचक)
6
गैरहजर
हजेरीशिवाय  (रीतिवाचक)
7
बरहुकूम
हुकुमाप्रमाणे  (रीतिवाचक)
8
बिनशर्त
शर्तीशिवाय  (रीतिवाचक)
9
गैरशिस्त
शिस्तीशिवाय  (रीतिवाचक)
10
बिनचूक
चुकीशिवाय (रीतिवाचक)
11
दररोज
प्रत्येक  दिवशी  (कालवाचक )

इ)  मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रिया विशेषनाप्रमाणे वापरले जातात,
हि पण अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहेत.


         


1
घरोघरी
प्रत्येक  घरी (स्थलवाचक)
2
वारंवार
प्रयेक  वारी  (कालवाचक )
3
पानोपानी
प्रत्येक  पानात (स्थलवाचक)
4
गल्लोगल्ली
प्रत्यक गल्लीत (स्थलवाचक)
5
दिवसेंदिवस
प्रत्येक  दिवशी (कालवाचक)
6
जागोजागी
प्रत्येक  जागी  (स्थलवाचक)
7
दारोदार
प्रत्येक  दरी  (स्थलवाचक)


2)  तत्पुरुष  समास  (द्वितीय  पद  प्रधान ):
या समासातील दुसरेपद प्रधान  असून, समासाचे विग्रह करताना अर्थाच्या दृष्ठीने गाळलेला  शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो.

तत्पुरुष समासाचे खालील सहा  प्रकार पडतात.


अ ) विभक्ती तत्पुरुष : ज्या तत्पुरुष  समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा  विभक्तीचा अर्थ व्यक्त  करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास  म्हणतात.




क्र.
सामासिक शब्द 
विग्रह   
समास
1
सुखप्राप्ती
सुखाला प्राप्त
द्वितीय तत्पुरुष
2
दु:खप्राप्त
दु:खला प्राप्त
द्वितीयतत्पुरुष
3
तोंडपाठ
तोंडाने पाठ
तृतीयतत्पुरुष
4
भक्तीवश
भक्तीनेवश
तृतीयतत्पुरुष
5
बुद्धीजड
बुद्धीने  जड
तृतीयतत्पुरुष
6
गुणहीन
गुणाने हीन
तृतीयतत्पुरुष
7
क्रीडांगण
क्रीडेसाठी अंगण
चतुर्थीतत्पुरुष
8
सचिवालय
सचिवासाठी  आलय
चतुर्थीतत्पुरुष
9
गायरान
गायीसाठी  रान
चतुर्थीतत्पुरुष
10
तपाचरण
तपासाठीआचरण
चतुर्थीतत्पुरुष
11
सेवानिवृत्त
सेवेतून निवृत्त
पंचमी तत्पुरुष
12
ऋणमुक्त
ऋणातून   मुक्त
पंचमी तत्पुरुष
13
चोरभय
चोरापासून भय
पंचमी तत्पुरुष
14
जातिभ्रष्ट
जातीतून भ्रष्ट
पंचमी तत्पुरुष
15
राजपुत्र    
राजाचा पुत्र
षष्ठी तत्पुरुष
16
राजवाडा
राजाचा  वाडा
षष्ठी तत्पुरुष
17
पाणसाप    
पाण्यातील साप
सप्तमी तत्पुरुष
18
वनभोजन
वनातील भोजन
सप्तमी तत्पुरुष
19
पाणकोंबडा 
पाण्यातील कोंबडा
सप्तमी तत्पुरुष
20
घरजावई
घरातील  जावई
सप्तमी तत्पुरुष 


                  
आ ) अलुक  तत्पुरुष:
ज्या तत्पुरुषात पुर्वपदाच्या सप्तमीच्या ‘ई’ विभक्ती प्रत्ययच लोप होत नाही, त्यास अलुक तत्पुरुष (अलुक-लोप न पावणारे) असे म्हणतात.

1)    पंकेरूह  (ए=अ+ई)
2)    कर्मणी प्रयोग (ई)
3)    कर्तरी प्रयोग (ई)
4)    तोंडी लावणे (मराठीतील उदाहरण) (ई) 
5)    अग्रेसर  (ए=अ+ई)

इ)उपपद तत्पुरुष  / कृदंत  तत्पुरुष  :
ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातुसाधित / कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही, त्यास उपपद / कृदंत तत्पुरुष समास म्हणतात.

नीरज
निरात जन्मलेले
कुंभकार
कुंभ करणारा
ग्रंथकार
ग्रंथ करणारा
शेतकरी
शेती करणारा  



खग
आकाशात  गमन  करणारा
लाचखाऊ
लाच  खाणारा
मार्गस्थ
मार्गावर  असलेला 
जलद
जल  देणारा
पंकज
पंकात  (चिखलात ) जन्मणारे
द्विज
दोनदा  जन्मणारा  (पक्षी, ब्राम्हण, दात)
सुखद
 सुख   देणारे


ई) नत्र तत्पुरुष:
ज्या  तत्पुरुष समासातील पहिले पद हे अ, अन, न, ना, बे, नि, गैर  यासारख्या अभाव किंवा निषेध दर्शक उपसर्गाने सुरु होते त्यास नत्र तत्पुरुष समास म्हणतात.





नापसंत
पसंत  नसलेला
बेसावध
सावध  नसलेला 
निरोगी
रोग  नसलेला
अन्याय
न्याय  नसलेला
अशक्य
शक्य  नसलेला
अयोग्य
योग्य  नसलेला
बेडर
डर  नसलेला
अनादर
आदर  नसलेला
निर्दोष 
दोष नसलेला 
बेकायदा
कायदेशीर  नसलेला 
नाईलाज
इलाज नसलेला
अहिंसा
हिंसा  नसलेला


उ)    कर्मधारय   समास :
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून, पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदाचा संबंध विशेषण व विशेष्य  स्वरूपाचा असतो  त्यास  कर्मधारय समास म्हणतात. काही प्रसंगी दोन्हीही शब्द विशेषण असतात.






पुरुषोत्तम
उत्तम  असा  पुरुष
घनश्याम  
घणासारखा  श्याम
मुखकमल
मुख   हेच  कमाल
महाराष्ट्र
महान  असे  राष्ट्र
नीलकमल
निळे  असे  कमाल
महादेव
महान  असा  देव
तपोबल
तप  हेच  बाल
हिरवागार
खूप  हिरवा
लालभडक
खूप  लाल
भवसागर
विश्वरूपी  सागर
वेषांतर
दुसरा  वेश
घननीळ 
निळा  असा  घन
रक्तचंदन
रक्ता  सारखे  चंदन
विद्याधन
विद्या  हेच  धन
पितांबर
पिवळे  असे  वस्त्र 



ऊ)    द्विगु  समास :
ज्या   कर्मधारय  समासातील  पहिले  पद  हे  संख्याविशेषण असते  व  या सामासिक शब्दातून  एक  समूह सुचविला  जातो, त्यास द्विगु समास म्हणतात.



बारभाई
बाराभावांचा  समुदाय
नवरात्र
नऊ  रात्रींचा  समूह
पंचवटी
पाच  वादांचा  समूह
त्रैलोक्य
तीन  लोकांचा  समुदाय
त्रिभुवन
तीन  भुवनांचा  समुदाय
चातुर्मास
चार  महिन्यांचा  समूह 
साप्ताह
सात   दिवसांचा  समूह
पंचपाळे
पाच  पाल्यांचा  समुदाय
चौघडी
चार  घड्यांचा  समुदाय

ए)    मध्यम   पद  लोपी  समास :
ज्या   कर्मधारय  समासात  पहिल्या  पदाचा  दुसऱ्या  पदाशी  सबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यम पद लोपी समास म्हणतात.


साखरभात
साखर्घाळून केलेला भात
कांदेपोहे 
कांदे घालून केलेले पोहे
चुलत सासरा 
नवऱ्याचा चुलत या नात्याने सासरा
मावसभाऊ
मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ
पुरणपोळी
पुरण घालून केलेली पोळी
घोडेस्वार
घोडा असलेला स्वर
गुरुबंधू
गुरूचा शिष्य या नात्याने बंधू
मामेभाऊ
मामाचा मुलगा या नात्याने भाऊ


३) द्वंद्व  समास :
ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्वाची असतात, त्यास द्वंद्व समास म्हणतात.
द्वंद्व समासाचे प्रकार:

अ)    इतरेतर द्वंद्व समास:
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना "आणि, व" या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लेगतो.


बहिणभाऊ
बहिण व भाऊ
विटीदांडू
विटी आणि दांडू
स्त्रीपुरुष
स्त्री आणि पुरुष
भीमार्जुन
भीम आणि अर्जुन
ने-आन
ने आणि आन
पशुपक्षी
पशु आणि पक्षी
रामलक्ष्मण
राम आणि लक्ष्मण
आईवडील
आई आणि वडील
कृष्णार्जुन
कृष्ण आणि अर्जुन
अहिनकुल
अहि आणि नकुल
दक्षिणोत्तर
दक्षिण आणि उत्तर

ब)    वैकल्पिक द्वंद्व समास:
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या विकल्प दर्शक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लेगतो.



पंधरासोळा
 पंधरा किंवा सोळा
मागेपुढे
 मागे किंवा पुढे
पापपुण्य 
 पाप किंवा पुण्य
सत्यासत्य 
सत्य किंवा असत्य
न्यायान्याय
न्याय किंवा अन्याय
छोट्यामोठ्या
छोट्या किंवा मोठ्या
बरेवाईट
बरे अथवा वाईट


इ)    समाहार द्वंद्व समास:
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही अंतर्भाव केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात.




बाजारहाट
बाजारहाट व तत्सम वस्तू
चहापाणी
चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ
भाजीपाला
भाजी, पाला व तत्सम वस्तू
केरकचरा
केरकचरा व इतर  टाकाऊ पदार्थ.
वेणीफणी
वेणीफणी व इतर साजशृंगार 
मीठभाकर
मीठ, भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ
शेतीवाडी
शेती, वाडी व इतर तत्सम जायदाद


4) बहुर्वीही समास:
ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून, त्या दोन पदाशिवाय  तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते, त्या सामासिक शब्दास बहुर्वीही समास म्हणतात.

या समासाचे चार प्रकार पडतात:

अ)        विभक्ती बहुर्वीही:

विभक्ती बहुर्वीही समासाचे दोन प्रकार पडतात.

१) सामानाधीकरण:

विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
1
लक्ष्मीकांत
लक्ष्मी आहे कांता ज्याची
विष्णू (प्रथमा)
2
वक्रतुंड
वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो
गणपती (प्रथमा)
3
नीलकंठ
नील आहे कंठ ज्याचे तो
शंकर (प्रथमा)
4
भक्तप्रिया
भक्त आहे प्रिय जयला तो
देव (प्रथमा)
5
जितेंद्रिय
जीत आहेत इंद्रिय ज्याने तो
मारुती (प्रथमा)
6
लंबोदर
लांब आहे उदार ज्याचे असा तो
गणपती (प्रथमा)
7
पांडुरंग
पांडूर आहे रंग ज्याचे असा तो
विठ्ठल (प्रथमा)

२)व्याधीकरण:

विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.

1
सुधाकर
सुधा आहे करत असा तो (चंद्र) (प्रथमा/ सप्तमी)
2
गजानन
गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी/ प्रथमा)
3
भालचंद्र
भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) (सप्तमी/ प्रथमा)
4
चक्रपाणी
चक्र आहे पानीत असा तो ( विष्णू) (प्रथम/ सप्तमी)



आ) नत्र बहुर्वीही समास:
ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि, असे नकारदर्शक असेल तर, त्यास नत्र बहुर्वीही समास म्हणतात.

१)
अव्यय
नाही व्यय ज्याला ते
२)
अनंत
नाही अंत ज्याला ते
३)
निर्धन
गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो
४)
निरास
नाही रस ज्यात ते
५)
नाक
नाही एक (दु:ख) ज्यात ते
६)
अनादी
नाही आदी ज्याला तो
७)
अखंड
नाही खंड ज्याला असे ते
८)
अनियमित
नियमित नाही असे ते
९)
अनाथ
जयला नाथ नाही असा तो
१०)
अस्पृश्य
यला स्पर्श करत नाही असे ते
११)
निर्बळ
निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो
१२)
निर्बुद्ध
ज्याला बुद्धी नाही असा तो
१३)
अकर्मक
नाही कर्म जयला असे ते
१४)
नास्तिक
नाही आस्तिक असा तो

इ) सहबहुर्वीही समास:
 जय बहुर्वीही समासाचे पहिले पद 'सह'  किंवा 'स' अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या  विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुर्वीही समास म्हणतात.

१)
सदर
आदराने सहित असा तो
२)
सफल
फळाने सहित असे ते
३)
सवर्ण
वर्णासहित असा तो
४)
सहपरिवार
परिवारासहित असा तो
५)
सबल
बलाने सहित असा तो

ई)  प्रादि बहुर्वीही समास:
 ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वि अशा उपसर्गानी युक्त असते त्यास प्रादि बहुर्वीही समास म्हणतात.



१)
सुमंगल
पवित्र आहे असे ते
२)
दुर्गुणी
गुणापासून दूर असलेला
३)
प्रबळ
अधिक बलवान असा तो
४)
विख्यात
विशेष ख्याती असलेला तो
५)
निर्घुण
निघून गेली आहे घृणा ज्यातून तो
           
  
Tags: 

  • marathi vyaakran marathi vyakran marathi grammar marathi grammar in marathi font in marathi language marathi vyakran blog mpsckatta mpsccurrent mpscguidance mpsc exam marathi gk marathi mpsc
  • naam sarvnaam visheshab kriyapad alankar samas vrutte sandhi vakya prachar mhani saman arthi shabd virudh arthi shabd vakyache prakar prayog kartari karmani practice test sarav test