तत्सम शब्द

संस्कृत भाषेतून जसेच्या तसे म्हणजे शब्दांच्या रुपात काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले शब्द , त्यांना तत्सम शब्द म्हणतात  .

काही तत्सम शब्द :
कवि   , मधु , गुरु , पिता , पुत्र , कन्या , वृक्ष , पुरुष , धर्म , सत्कार , समर्थन , उत्सव , पुष्प , जल , प्रीति , भीति , कर , ग्रंथ , पृथ्वी , भूगोल , विद्वान , भगवान , परंतु , यद्यापि , यथामति , कर्ण , पर्ण , अरण्य , हस्त , मस्तक , कर्म , ओठ  , अग्नि, नदी , कलम , मंदिर , राजा , होम , महर्षि , प्रसाद ,सन्मति , तारा  , दुष्परिणाम , संत , गंध , तिथी , पिंड , मंत्र , प्रीत्यर्थ , उपकार , घंटा , अभिषेक , भोजन , समर्थन , नैवेध्य , निस्तेज , दर्शन , सूर्य , कलश , पत्र , निर्माल्य , शिखर , देवर्षि , अब्ज , पुण्य , संगती , प्रकाश , नयन , उमेश , स्वल्प , प्रातःकाल , वाडः निश्चय , आकाश , सुत्र, गणेश , वृद्ध , विद्वान , गायन , भोजन , बुद्धि , श्राद्ध , जगन्नाथ , स्वामि , घृणा , दंड , उत्तम , पाप , कार्य , सभ्य , संसार , कविता , अश्रु , यद्यपि , तट्टिका , देवालय ,    इ .  
सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त व्याकरणासाठी एक परिपूर्ण वेब साईट .सराव टेस्ट - 6


 • सराव टेस्ट -61) थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?


 1. थंड अन्न खाणे 
 2. सावकाश जेवणे 
 3. उपाशी राहणे
 4. भरपूर जेवणे


फारसी भाषेतून मराठीत आलेले काही शब्द

फारसी भाषेतून मराठीत आलेले काही शब्द

शहनाई, जलसा, सामान , हकीकत ,सरकारी, गुजराण,शाहीर, रियाज, शाई, खलिता,
कलम, अबकारी, जरतारी, कुमक, अत्तर , अब्रू , किताब, जाब, शफत, तनखा,
कारभार, खुलासा, दरबार, पेशवा ,पोशख , सौदागर , कामगार , गुन्हेगार, फडनविस , दिरंगाई, खाना , पैदा, बाग, बगीचा, मशीद, महिना,
मोहोर, मेणा, रसद, रवानगी, लेजीम, शादी, सरकार, पंज, हप्त,
हजार, अव्वल, दिगर, निमे, हमेशा, सबब, अगर, लेकीन, की, वाह,
शाबास, गप, खबर्दार, खाशी, फौज, बारगीर, शिलेदार, लष्कर,
स्वार, गोलंदाज, जिरेटोप, जीन, तोफ, समशेर, तंबू, शामियाना,
लगाम, मेख, खंदक, बुरुज, किल्ला, इमारत, पगडी, मखमल, चादर,
रजई, खुर्ची, मेज, पलंग, तबक, समई, पानदान, अगरबत्ती, अंगूर,
खसखस, खिसमिस, पिस्ता, बदाम, अफू, खरबूज, ढोल, दिलरुबा,
नगारा, नौबत, शरमिंदा , नोकरी , गजल , दीवानखाना , गुलाब , बारदान , गलीचा , बाजार , जुलुम , अक्कल , हुशारी , मस्ती , डावपेच , जबरी , मेवा , मिठाई , कागद , इ .

सराव टेस्ट -5 • सराव टेस्ट -5 (Practice Test )


1) मराठी भाषेत एकूण स्वर किती?

 1. ४८
 2. ३४
 3. ३६
 4. १२

4. १२

सराव टेस्ट - 4 • सराव टेस्ट - 4(Practice test)1) नामाच्या आधी येउन नामाबद्दल विशेष माहिती देणारया शब्दास ________म्हणतात.

 1. विशेषण
 2. गुण विशेषण
 3. संख्या विशेषण
 4. अनिश्चित संख्यावाचक विशेषण

1. विशेषण

सराव टेस्ट -3
 • सराव टेस्ट -3(Practice Test)


1) पुढीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
 1. झाड
 2. धोंडा
 3. आम्र
 4. बोका
3. आम्र

सराव टेस्ट - 2 • सराव टेस्ट - 2(Practice Test)


1) 'डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
 1. बरे वाटणे
 2. स्वच्छ दिसणे
 3. समाधान होणे
 4. इच्छा पूर्ण करणे
3. समाधान होणे


सराव टेस्ट -१


 • सराव टेस्ट -१(Practice Test)


1) वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "
 1. विधानार्थी
 2. प्रश्नार्थी
 3. नकारार्थी
 4. उद्गारार्थी
1. विधानार्थी


व्यंजने

व्यंजने

वर्णविचार

वर्ण विचार

व्यंजने

समासमनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-
कधी तो काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे
जोडशब्द बनवितो,
उदा. पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी पोळपाट
असा जोडशब्द
वापरतो. मराठी भाषेत दोन
किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचे
एकत्रीकरण करून त्यांचा एक शब्द
करण्याची परंपरा पुष्कळ
जुनी आहे. या व्यवस्थेने शब्दांचा संक्षेप होऊन
थोड्या शब्दांत
पुष्कळ अर्थ व्यक्त होतो आणि भाषेत
आटोपशीरपणा येतो.
शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द
तयार
होतो त्याला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.
हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार
झाला हे स्पष्ट
करण्यासाठी त्याची फोड करून
सांगण्याच्या पद्धतीला 'विग्रह'
असे म्हणतात.

समासात किमान दोन शब्द किंवा पडे एकत्र येतात.
या दोन
शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे
त्यावरून समासाचे
चार प्रकार पडतात.

क्र.
समासाचे नाव
प्रधान पद
उदाहरण
१.
अव्ययीभाव
पहिले
आजन्म, पदोपदी
२.
तत्पुरुष
दुसरे
राजवाडा, गायरान
३.
द्वंद्व
दोन्ही
पितापुत्र, बरेवाईट
४.
बहुव्रीही
अन्य
चंद्रमौली, गजमुख

● अव्ययीभाव
"ज्या समासातील पहिले पद बहुदा अव्यय असून ते
प्रमुख असते व
ज्या सामासिक शब्दाचा वापर
क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समसाला '
अव्ययीभाव
समास' असे म्हणतात."
उदाहरणार्थ-
यथाक्रम - क्रमाक्रमाणे
प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला

● तत्पुरुष
दुसरे पद महत्त्वाचे -
उदा० महाराज
द्वंद्व
दोन्ही पदे महत्त्वाची -
उदा० रामकृष्ण

● बहुव्रीहि
दोन्ही पदांव्यतिरिक्त अनुल्लेखित शब्दाकडे निर्देश
-
उदा० नीलकंठ

● समासविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी-
1. एकाच सामासिक शब्दांचे विग्रह
वेगवेगळ्या प्रकारे
करता येतात
2. समासातील पदे संस्कृतातून आलेली (तत्सम)असतील
तर
त्यांचा संधी करावा. जसे
विद्या+अभ्यास=विद्याभ्यास,
3. मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो. तोंड
+ओळख=तोंडओळख
4. भिन्न भाषांतील शब्दांचा समास
टाळावा.हेड्शिक्षक(हेडमास्त
ठिक),डाकगृह(डाकघर ठीक आहे),गृहजावई(घरजावई
बरोबर
आहे).

प्रयोग